दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाला मुख्यमंत्र्यांच्या खास शुभेच्छा!

    05-Oct-2023
Total Views |

cm and digpal 
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवराज अष्टकातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा एकीकडे सुरु असताना दुसरीकडे त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिकपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
काय म्हणाले मुख्यमंत्री ? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “धर्मसंरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ येत्या १६ फेब्रूवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निर्माते मल्हार पिचर्स आणि वैभव भोर, किशोर पाटकर तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा.
 
 
 
दरम्यान, दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' 'सुभेदार' या पाच चित्रपटांतून त्यांनी शिवकालावर बेतलेल्या ऐतिहासिक काळाला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर तर जिजाऊसाहेबांच्या भुमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकणार आहेत. याशिवाय विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, भूषण विनतरे, अमित देशमुख हे कलाकार झळकणार असून अद्याप संभाजी महाराजांची भुमिका कोण साकारणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.