मुंबई : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागात भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून १० वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या भरतीच्या माध्यमातून राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील ड्राफ्ट्समन ‘सी’, लॅब असिस्टंट ‘बी’, लॅब असिस्टंट ‘ए’, ट्रेड्समन ‘बी’ आणि हेल्पर ‘बी’ या रिक्त पदांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून दि. ३० ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.
अर्जदारास अर्ज करताना अर्जशुल्क भरावा लागणार आहे. या मागासवर्गीय आणि महिला उमेदवारांना सूट देण्यात आली असून सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहे. तसेच, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.