मुंबई : 'महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. महापारेषणद्वारे करण्यात येणाऱ्या भरतीद्वारे सहाय्यक अभियंता(ट्रान्समिशन), सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) पदांच्या एकूण ३९६ जागा भरल्या जाणार आहेत.
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शाखेतील पदवी तर सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) पदासाठी इलेक्ट्रिकल अँड टेलीकम्युनिकेशन शाखेची पदवी असणे बंधनकारक असेल. तसेच, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, महापारेषणंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायकअभियंता, उपकार्यकारी अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
महापारेषण अंतर्गत विविध पदांच्या भरतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.