बँकिंग क्षेत्रातील आर्किटेक्चर बदलण्यासाठी क्रिसीलचा रिपोर्ट जाहीर

    04-Oct-2023
Total Views |
Crisil
 
 
बँकिंग क्षेत्रातील आर्किटेक्चर बदलण्यासाठी क्रिसीलचा रिपोर्ट जाहीर

 
मोहित सोमण
 

मुंबई: क्रीसीलने ( CRISIL) नुकताच आपला शोध प्रबंध असलेला रिपोर्ट जाहीर केलेला आहे. बँकिग फ्रेमवर्क मध्ये बदल करण्यासाठी ' अ सिंपलीफाईड एटंरप्राईजेस मेथोडिओलॉजी ( A Simplified Enterprise Methodology) नावाने रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये बँकिग सिस्टीम मध्ये परिवर्तन करून काळानुसार महत्वाचे बदल करण्यासाठी सुचवले गेले आहेत. वाढत्या डेटा क्लाऊड मॅनेजमेंट, डेटा ब्लॉकचेनचा उपयोग पाहता अनेक बदल यात सुचवले गेले आहेत. पारंपारिक सुविधाहून अधिक ग्राहकावर अधिक लक्ष देत विविध अडचणी सोडविण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग करणे हे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
 
डेटा आणि सिक्युरिटी इकोसिस्टीम विकास करण्यासाठी उपाययोजना हव्या असून बिझनेस प्रोसेस, डेटा आर्किटेक्चर, गव्हर्नन्स, टेक्नॉलॉजी यामध्ये बदल सुचवले आहेत. सध्याच्या मुलभूत सुविधेत बदल करण्यासाठी डेटा विश्लेषण, कनेक्टिव्हिटी इत्यादी बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. प्रोसेस ऑप्टिमायझेशन करीता आयबीएम, सॅप , सेलोनिस व क्लाऊड सिस्टीम करिता आरडोक, एटंरप्राईज आर्किटेक्ट, आयबीएम अशा टूलचा वापर करण्याचे सुचवले गेले आहे.