मराठा आरक्षणाचं राजकारण करणाऱ्या रोहित पवारांना बसला फटका!
30-Oct-2023
Total Views | 52
मुंबई : आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरु होती. त्याला मराठा समाजाने विरोध केल्यानंतर यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. नेत्यांना अनेकठिकाणी गावबंदी असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर रोहित पवारांनी सोशल मिडीयावर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, "माझा आरक्षणाच्या लढ्यासाठी पाठींबा आहेच पण आता मनोज जरांगे-पाटील यांच्या आरोग्याबाबत चिंता वाटतेय… त्यामुळं सरकारने आता थोडाही वेळ न घालवता आणि कोणतंही राजकारण न करता पुढच्या काही तासात आरक्षणाबाबत निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, ही कळकळीची विनंती. तसंच आरक्षणाच्या विषयावर काम करत असलेल्या न्या. शिंदे समितीच्या बाबतीतही लोकांच्या काही शंका आहेत. त्यावरही सरकारने स्पष्टीकरण द्यावं, ही विनंती!" असं रोहित पवार म्हणाले आहेत.