मुंबई : "हिंदू धर्मातले जे अतिरेकी होते ज्यांना वर्ग व्यवस्था, वर्ण व्यवस्था हवी होती, त्यांनीच हे केलं. हिंदू धर्म आम्हाला माहिती नाही. पण सनातन धर्म हा कसा जन्माला आला? सनातनी व्यवस्थेला आमचा विरोधच आहे. हिंदू धर्मातले जे अतिरेकी होते. ज्यांना वर्ग, वर्ण व्यवस्था हवी होती. परत एकदा वर्ग आणि वर्ण व्यवस्था आणण्याचा यांचा विचार आहे." अशी गरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ओकली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "तुम्ही बुद्धाला संपवलं. नाही तर बुद्धांनी का त्याग केला? बुद्धाने त्याच्या मार्गाने का गेले ते समतेचं ज्योत त्यांनी का पेटवलं? त्याच्यानंतर कुणी मारलं? महावीर जैनांनी कर्मकांडाविरुद्ध भूमिका का घेतली? बसवेश्वरांना कोणी छळलं? चक्रधर स्वामी यांना कोणी छळलं? ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना आत्महत्या कोणी करायला लावली? सावतामाळीला कोणी छळलं? तुकाराम महाराजांच्या गाथा कोणी फेकल्या? तुकाराम महाराजांना मारहाण कोणी केली?"
"मृत्यूबद्दल मी काही बोलत नाही पण तुकाराम महाराजांच्या पूर्ण कुटुंबाचा छळ कोणी केला? संभाजी महाराज पकडून देण्याचं काम कुणी केलं? फुलेंना दगडांनी मारण्याचा त्यांचा खून करण्याचा प्रयत्न कोणी केला? सावित्रीबाईंना शेण कोणी मारलं? शाहू महाराजांनी मदत करून सुद्धा शाहूंची हत्या करण्याचं काम कोणी केलं? आंबेडकर साहेबांनी मनोस्मृती का जाळली? आंबेडकर साहेबांनी महाडच्या तळ्याचा तलावाचं आंदोलन का केलं? आंबेडकरांनी काळाराम मंदिरात प्रवेश का घेतला? याची उत्तरं द्या." असे प्रश्न आव्हा़डांनी उपस्थित केले आहेत.