'शासन आपल्या दारी' कार्यक्रमातुन मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!

    30-Oct-2023
Total Views |
 
Shinde
 
 
मुंबई : 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ येथे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमातुन मोठी घोषणा केली. महात्मा जोतिराव फुले योजना ३ लाखाची होती ती ५ लाखाची करण्यात आली आहे. सर्वांना ही योजना लागू होणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार आहेत. गेल्या अडीच वर्षात एकही सिंचन प्रकल्प मंजूर झाला नव्हता. पण, आपलं सरकार आल्यानंततर ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, "शेतकऱ्याला वर्षाला पहिले ६ हजार मिळायचे. पण, यात आता राज्य सरकारने भर घालुन त्याची किंमत आता १२ हजार झाली आहे. मागेल त्याला शेततळं, भांडवल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये, अशी भुमिका आपल्या सरकारची आहे. शेतकऱ्याच्या शेतपिकावर वन प्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्या जिल्ह्यात प्रायेगिक तत्वावर २१ हजार शेतकऱ्यांना सोलर मशीनचं वाटप करण्यात येईलं. स्थानिक पातळीवर मानधन स्वरुपात शिक्षक पद भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरूवात करावी." असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.