दारूच्या नशेत पोलिस हवालदारचे निर्दयी कृत्य; स्ट्रीट आर्टिस्ट 'गोल्डन मॅन'ला लाठीचा दणका

    03-Oct-2023
Total Views |

goldman

मुंबई :
'द लिव्हिंग स्टॅच्यू' किंवा 'गोल्डन मॅन' म्हणून ओळखल्या जाणार्‍या तौकीर अलम या कलाकाराला सोमवारी रात्री बँडस्टँड येथे एका पोलिस हवालदाराच्या निर्दयतेचा सामना करावा लागला. हा मारहाणीचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नेटकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याबाबत गोल्डमॅनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने सांगितले कि, "हा व्हिडिओ मुंबईच्या बँडस्टँड येथील सोमवारी रात्री ८ वाजताचा आहे. मी स्टॅच्यू आर्ट करताना एक पोलीस हवालदार दारुच्या नशेत माझ्याजवळ आला आणि मला लाठीने मारू लागला. संबंधित पोलीस हवालदारला याचा जाब विचारल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली. तसेच माझी कॉलर पकडून मला खेचले. त्यावेळी मला श्वास घेताना अडचण होत असल्याचे मी त्यांना सांगितले; परंतु, त्यांनी माझे काहीही न ऐकता मला पोलीस ठाण्यात नेऊन माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तरी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवून माझी मदत करावी, अशी विनंती." या शब्दात गोल्डमॅनने आपल्या भावना व्यक्त केल्या असून योग्य न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे.