बीएनपीएल खरेदी करताय, सावधान!

    03-Oct-2023
Total Views |

BNPL

मुंबई :
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज आणि अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये कपडे, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ९०% पर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास अजून वेगळी सूट मिळणार आहे.

याशिवाय आजकाल बरेच ग्राहक बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल) सारखे पर्याय देखील वापरत आहेत. लेझी पे, सिंपल, झेस्ट मनी, अॅमेझॉन पे लेटर, स्लाइस, पेटीएम पोस्टपेड या कंपन्या भारतात बीएनपीएल सेवा प्रदान करतात. या सेवेने तरूण वर्गाला प्रभावित केले आहे. कारण त्यात शून्य टक्के व्याजाने खरेदी करता येते. याशिवाय ईएमआयमध्ये पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी बीएनपीएल कंपन्या काही दिवसांचा अवधी देतात. तरी, आर्थिक शिस्तीशिवाय या सुविधेचा वापर महाग ठरू शकतो. त्यामुळे वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर खरेदी करण्याच्या तुलनेत बीएनपीएल योजना अधिक चालत आहे.

बीएनपीएलचा लाभ घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते...
  • बीएनपीएल कंपनी ग्राहकाच्या वतीने व्यापाऱ्याला पैसे देते. मात्र एकदा कंपनीने ग्राहकांच्या वतीने पैसे भरले की, ग्राहकाला ठराविक कालावधीत रक्कम परत करायची असते. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि पेटीएम या प्रकारची सेवा देतात.

  • बीएनपीएल सेवा ही सुविधा आहे की सापळा आहे हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे. या सेवेचा फायदा घेण्यासाठी आर्थिक शिस्त आवश्यक आहे. परंतु, काही तरुण खरेदीदारांकडे इतकी आर्थिक शिस्त आहे.

  • अनेक ग्राहक खिशाच्या बाहेर खरेदी करतात. यामुळे ठराविक वेळेत पैसे भरले जात नाहीत. त्यामुळे ते कर्जाच्या सापळ्यात अडकतात. हे जवळजवळ क्रेडिट कार्ड वापरण्यासारखे आहे.

  • जर ग्राहकाने वेळेवर पैसे भरले नाहीत तर, बीएनपीएल कंपन्या क्रेडिट स्कोअर एजन्सींना ग्राहकांची तक्रार करतात. यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होऊन पुढील कर्ज मिळणे कठीण होऊ शकते. तसेच वेळेवर पैसे न भरल्यास दंडही ठोठावला जातो. त्यामुळे या सेवेचा योग्य वापर केल्यास खरेदी करणे सोपे ठरते.

गोल्डमन सॅक्सच्या मते, भारतीय ई-कॉमर्स उद्योग २०२४ पर्यंत ९९अब्जापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. वर्ल्डपेच्या गेल्या वर्षीच्या ग्लोबल पेमेंट्स अहवालानुसार, बीएनपीएल २०२४ पर्यंत ३% वरून ९% पर्यंत वाढेल. ऑनलाइन खरेदी किंवा ई-कॉमर्स उद्योग वाढला तर बीएनपीएलही वाढेल.