मुंबई : देशात खाजगीकरणाचे वारे वाहू लागले असताना भारतीय बँकिंग क्षेत्राने दमदार कामगिरी केली आहे. भारतातील खाजगी बँकांनी नोकऱ्यांसंदर्भात दशकभरातील सर्वोत्तम आकडेवारी समोर आली आहे. भारतातील सरकारी बँकांच्या आकडेवारीपेक्षा खाजगी क्षेत्रातील बँकांनी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
दरम्यान, सरकारी बँकांच्या शाखेच्या संख्येत घट झाली असून खाजगी क्षेत्रातील बँकांच्या शाखांमध्ये सातत्याने वाढ दिसून आली आहे. तसेच, खाजगी बँकांच्या नवीन शाखांमुळे तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे खाजगी बँका सरकारी बँकांच्या तुलनेत रोजगारनिमिर्तीत पुढे असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ दरम्यान खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये ९८,५१८ नोकऱ्या निर्माण झाल्या.