मुंबई : लव्ह जिहाद पाठोपाठ आता 'लँड जिहाद' ने डोकं वर काढले असून या प्रकरणात दस्तरखुद्द प्रशासनातील काही मंडळी झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भात उच्च स्तरावरून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे लेखी निवेदन राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
गुंठेवारी दस्त नोंदणी बंद असून त्याबाबत सर्वोच न्यायालयात महाराष्ट्र शासनाकडून रिटपिटीशन दाखल आहे. न्यायालयाने त्यावर स्थगिती दिलेली आहे. सहायक निबंधक २ मालेगाव यांच्या कार्यालयात तुकडेबंदी कायदा विरोधात जावून जमिनीची खरेदी विक्री बिनधास्त सुरू आहे. विशेषतः बांग्लादेशी लोकांची वस्ती बसवण्याचं काम अधिकारी करत आहेत. असे आरोप नितेश राणेंनी लेखी निवेदनाद्वारे केले आहेत.