मुंबई : मेट्रोत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महा-मेट्रोकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मेट्रोअंतर्गत १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा-मेट्रो अंतर्गत रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत 'शिकाऊ उमेदवार' पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण निश्चित करण्यात आली असून नागपूर, पुणे आणि नवी मुंबई येथील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीकरिता अर्जदाराचे वय निश्चित करण्यात आले असून १७ ते २४ वर्षेदरम्यान वयोमर्यादा असणार आहे. तसेच, अर्जदारास १०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.