भिवंडी तालुक्यात केमिकल गोदामाला भीषण आग

    29-Oct-2023
Total Views |
Fire breaks out at chemical godown in Bhiwandi

ठाणे :
भिवंडी तालुक्यातील रहणाल गावच्या हद्दीत गोविंद कंपाऊंड मधील केमीकल गोदामात भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवार असल्याने गोदाम बंद असल्याने जीवितहानी टळली असली तरी मोठी वित्तहानी झाल्याचे समजते. आगीच्या धुराचे लोट दुरपर्यत पसरले होते. घटनास्थळी भिवंडी, ठाणे आणि कल्याण अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

ठाण्यानजीकच्या भिवंडी, रहनाल परिसरातील भारत पेट्रोल पंपच्या मागे शिवशक्ति कंपाउंड मधील केमिकल गोदामात भीषण आग लागली.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र आगीचे रौद्र रूप पाहुन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे व कल्याण अग्निशमन पथकांना पाचारण करण्यात आले.