भारतीय बँका डिजिटल व्यवहार प्रोत्साहनासाठी इन्सेंटीव्ह देणार
नवी दिल्ली: भारतीय बँकांनी डिजिटल व्यवहारांना तसेच सेंट्रल बँक डिजीटल करन्सी, इ रूपये इत्यादी चलनाला प्रोत्साहन देण्यासाठी इन्सेंटीव्ह देणार असल्याचे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. डिजिटल व्यवहारांचा रोख वाढवण्यासाठी ही योजना सरकारने राबवण्याचे ठरवले आहे.
कॅशबॅक, रिवार्ड पॉईंट्स अशाप्रकारच्या सुविधा सरकार देऊ शकते. सुत्रांनी यावेळी आपली ओळख सांगण्यास नाकारले आहे. आरबीआयने इ रुपयेंकरिता मोहीम सुरू केली होती. आरबीआयला यानिमित्ताने मोठा डिजिटल व्यवहाराचा प्रतिसाद अपेक्षित होता परंतु तितका अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने आता ही मोहीम व्यापक करायचे आरबीआयने ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून आरबीआयने इन्सेंटीव्ह योजना आणण्यास सुरुवात केली आहे. रिटेल व्यवहार अजूनही अपेक्षेहून कमी असून प्रतिदिनी २५००० च्या घरात आहे. आरबीआयने या आधी युपीआय देखील सुरू केले होते.