नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या रोमहर्षक लढतीत किवींचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८९ धावांचा पाठलाग करताना किवींकडून ९ बाद ३८३ धावांचा डोंगर उभारता आला. परिणामी, ५ धावांनी न्यूझीलंडला हा सामना गमवावा लागला. अॅडम झाम्पाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
आस्ट्रेलिया विरुध्द न्यूझीलंड यांच्यात धरमशाला येथे विश्वचषकाचा सामना खेळविण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (८०) आणि ट्रेव्हिस हेड (१०९) धावा यांच्यात पहिल्या विकेट्ससाठी १७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.
किवींकडून ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. कांगारुंनी दिलेल्या २८९ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना किवींना ९ बाद ३८३ धावाचं करता आल्या. युवा फलंदाज रचिन रविंद्र याने ५ षटकार आणि ९ चौकारांसह ८९ चेंडूत ११६ धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.