राम मंदिरावरुन राजकारण करणाऱ्या राऊतांना आणि खुर्शीद यांना मोर्यांनी झापलं; म्हणाले, "कारसेवकांवर गोळ्या..."

    27-Oct-2023
Total Views |
  keshav prasad morya
मुंबई : "कारसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा हे रामाचे भक्त कुठे होते." अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रणावरून राजकारण करणाऱ्या संजय राऊत आणि सलमान खुर्शीद यांना सुनावले आहे. अयोध्येतील राममंदिरात रामललाच्या विराजमन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रणावरून विरोधक राजकारण करत आहेत.
 
हा कार्यक्रम केवळ एका पक्षाचा कार्यक्रम बनवला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी केला होता. देव फक्त एका पक्षापुरता मर्यादित झाला आहे का? असा सवालही त्यांनी केला होता. खुर्शीद यांच्या या वक्तव्यावर आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे.
 
पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येत भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या काळात देशभरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. राम मंदिरात अनेक दिवस अगोदर पूजा सुरू होईल.