मुंबई : माहिती व प्रसारण मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून १० वी उत्तीर्णांना माहिती प्रसारण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भरतीच्या माध्यमातून कर्मचारी कार चालक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्जदारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत करण्यात येणाऱ्या भरतीद्वारे कर्मचारी कार चालक पदाच्या एकूण ०८ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.
या भरतीकरिता अर्जदाराकडून अर्ज पाठविण्याचा पत्ता श्रीमती. कीर्ती गुप्ता, अवर सचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक ५४४, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – ११००१. या पत्त्यावर पाठवायचा आहे. निवड झालेल्या उमेदवारास वेतनश्रेणी – Rs. ५,२०० – २०,२००/- नुसार दरमहा वेतन देण्यात येईल.
माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.