मुंबई : “सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. त्या चौकटीतच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला प्रथमदर्शी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण पुरावे पाहण्याची गरज नाही,” असा युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. अपात्रतेसंबंधी सुनावणीच्या वेळी करण्यात आलेल्या या युक्तीवादामुळे नार्वेकर संतप्त झाले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की, स्वत: निर्णय घ्यायचा, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. ठाकरे गटाने अध्यक्षांसमोर युक्तिवाद करताना म्हटलं की, ’अध्यक्षांची भूमिका नियम पुस्तिकेत सांगितली आहे. भ्रष्टाचार हे कारण सरकार पाडण्यासाठी ग्राह्य धरता येत नाही. सत्तांतराकाळात काय घडलं इतकंच तुम्हाला पाहायचं आहे. राजकीय पक्षाची संरचना पाहण्याची आता गरज नाही. शिंदे गटाची याचिका पूर्णपणे बेकायदेशीर आहे,” असा दावाही केला.
दरम्यान, शिंदे गटाने युक्तिवाद करताना काही मुद्दे मांडले. त्यात अपात्रतेबाबत अध्यक्षांचे अधिकार अबाधित आहे. तसेच प्रतोद कोण आहे हेही पाहायला हवं. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या निर्णयाचा दाखला शिंदे गटाच्या वकिलांनी यावेळी दिला.