'इफ्तार क्या होता है?' - बिहारमध्ये इयत्ता ९वीच्या संस्कृत विषयाच्या परीक्षेतील प्रश्न

    27-Oct-2023
Total Views |
 nitish-kumar-tejashwi-yadav-iftar-party
 
पाटना : बिहारमध्ये इयत्ता ९वीच्या संस्कृत विषयाच्या परीक्षेत इस्लामशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप आमदार म्हणाले की, "परीक्षेचा पेपर पाहिल्यास असे वाटते की, हा एखाद्या इस्लामिक देशाचा परीक्षेचा पेपर आहे."
 
मोहनिया, कैमूर येथील भाजप आमदार जीवन कुमार यांनी या प्रश्नपत्रिकेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, "बिहार सरकार पाकिस्तानच्या शिक्षण विभागाचे स्वरूप राज्यात लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, ज्या मुलांना उर्दू भाषा येत नाही, ते त्याचे उत्तर कसे देणार? हे चुकीचे आहे."
 
जीवन कुमार पुढे बोलताना म्हणाले की, “मदरसा नितीश कुमार यांच्या जवळचा आहे. अन्यथा ते असे करणार नाहीत. केवळ मुस्लिमच मतदार नाहीत. असे करून तो इतर धर्माच्या लोकांची छेड काढत आहे. नितीश सरकारला बिहारचे शिक्षण पाकिस्तान आणि अरबी शिक्षणाच्या स्वरूपावर चालवायचे आहे. आमच्या धर्माशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही."
 
वास्तविक, २६ ऑक्टोबर २०२३ रोजी संपूर्ण बिहारमध्ये संस्कृत विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात इस्लामशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये २५ बहुपर्यायी प्रश्नांपैकी ३ प्रश्न इस्लामशी संबंधित होते. तर १० लहान उत्तरांपैकी ५ प्रश्न इस्लामवर होते. याशिवाय ५ लांबलचक उत्तरांपैकी २ प्रश्न इस्लामचे होते.
 
असे काही प्रश्न विचारण्यात आले - मुस्लिमांचा सर्वोत्तम सण कोणता? ईदमध्ये कोणता पदार्थ प्रसिद्ध आहे? जकात म्हणजे काय? इफ्तार म्हणजे काय? रोजा कधी मोडतो? फित्रा कशाला म्हणतात? ईद हा कोणता सण आहे? ईदमध्ये काय होते? ईदचा सण काय संदेश देतो? इत्यादी.
 
वादानंतर यावर कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. पाटणा येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाचे संस्कृत शिक्षक जितेंद्र कुमार म्हणतात की यात वादाचा काही अर्थ नाही. इयत्ता नववीत ईद महोत्सवाचा एक अध्याय असून तो प्रत्येकाने वाचावा, असे त्यांनी सांगितले. हा अभ्यासक्रम बिहार शाळा परीक्षा मंडळाने तयार केला आहे.