पाकिस्तानकडून बीएसएफच्या जवानांवर गोळीबार! एक जण जखमी
27-Oct-2023
Total Views |
मुंबई : पाकिस्तानने बीएसएफच्या जवानांवर बेछूट गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. जम्मूच्या अरनिया भागातील जवानांच्या चौक्यांवर हा गोळीबार करण्यात आला आहे. यात बीएसएफचा एक जवान आणि तीन नागरिक जखमी झाले आहेत.
२६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सने भारतीय जवानांच्या पाच चौक्यांवर बेछूट गोळीबार केला. याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या घटनेमुळे सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जखमी बीएसएफ जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. याआधीही १७ ऑक्टोबरला पाकिस्तानने विनाकारण गोळीबार केल्याने दोन जवान जखमी झाले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.