एसबीआय कार्डच्या वतीने फेस्टिव्ह ऑफर 2023 ची घोषणा

जवळपास 2700+ शहरांत सुमारे 2200 ऑफरसह उत्सवाची रंगत वाढणार एसबीआय कार्ड ग्राहकांना 27.5% कॅशबॅकचा आनंद लुटता येणार

    27-Oct-2023
Total Views |
 
 
 
SBI Credit card
 
 
 
 
एसबीआय कार्डच्या वतीने फेस्टिव्ह ऑफर 2023 ची घोषणा
 
जवळपास 2700+ शहरांत सुमारे 2200 ऑफरसह उत्सवाची रंगत वाढणार 
 
एसबीआय कार्ड ग्राहकांना 27.5% कॅशबॅकचा आनंद लुटता येणार
 
नवी दिल्ली: SBI कार्ड, भारतातील सर्वात मोठ्या प्युअर-प्ले क्रेडिट कार्ड जारीकर्त्याने, सणासुदीच्या 2023 साठी भारतभरातील कार्डधारकांसाठी अनेक रोमांचक ऑफर आणल्या आहेत. लाखो SBI कार्ड ग्राहक सुमारे 2200 मर्चंट फंड आणि कॅशबॅक ऑफरचा लाभ ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांमधून घेऊ शकतात. टियर 2 आणि टियर 3 सह प्रमुख शहरांत ग्राहकोपयोगी वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, फॅशन, फर्निचर, दागिने आणि किराणा माल यासह लोकप्रिय श्रेणींच्या विस्तृत संचात ऑफरचा विस्तृत प्रसार होतो. कार्डधारक सहज मोठी खरेदी करू शकतील याची खातरजमा करण्यासाठी SBI कार्डच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण ब्रँडसह अनेक EMI केंद्रित ऑफर तयार केल्या आहेत.
 
SBI कार्ड ग्राहकांसाठी 2023 मध्ये सणांची ऑफर 600 हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील ऑफर आणि 1500 हून अधिक प्रादेशिक आणि हायपरलोकल ऑफर समाविष्ट आहेत, हे प्रस्ताव 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत वैध असतील. या उत्सव ऑफरचा भाग म्हणून, 2700 हून अधिक शहरांमधील SBI कार्ड ग्राहक Flipkart, Amazon, Myntra, Reliance Retail group, Westside, Pantaloons, Max, Tanishq, आणि TBZ, यासह विविध भागीदार ब्रँडवर 27.5% पर्यंत कॅशबॅक आणि इन्स्टंट डिस्काउंट चा ऑफर लाभ घेऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, SBI कार्डच्या EMI केंद्रित ऑफर ग्राहकोपयोगी वस्तू, मोबाइल आणि लॅपटॉप विभागातील आघाडीच्या ब्रँडवर उपलब्ध आहेत. प्रमुख ब्रँड्समध्ये Samsung, LG, Sony, Oppo, Vivo, Panasonic, Whirlpool, Bosch, IFB, HP, आणि Dell आणि बरेच काही समाविष्ट राहील.
 
एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ श्री. अभिजीत चक्रवर्ती म्हणाले, “ ग्राहक-केंद्रित ब्रँड म्हणून, आम्ही नेहमी आमच्या ग्राहकांचा एकंदर अनुभव वृद्धिंगत करण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये त्यांचा खरेदी अनुभव सतत अधिक फायदेशीर करण्याचे उद्दिष्ट समाविष्ट आहे.SBI कार्ड फेस्टिव्ह ऑफर 2023 हे आमच्या प्रामाणिक हेतूचे उत्तम उदाहरण आहे.हा उपक्रम आमच्या कार्डधारकांच्या सणांना समृद्ध करेल आणि त्यात भर घालेल ही आशा आम्हाला वाटते.”