शेअर मार्केट अपडेट्स: शेअर बाजारात खळबळ निफ्टी सेन्सेक्स मध्ये मोठी कपात
मुंबई: सलग सहाव्या सत्रात गुंतवणूकदारांना जोर का झटका लागला असून मोठे नुकसान भागभांडवलदारकांना सहन करावे लागले. सेन्सेक्स निफ्टी ५० हे प्रत्येकी ५ टक्यांने कोसळले आहे. आज गुरुवारी गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक कारणांनी ही उतरंडी दिसत आहे.वाढलेले व्याजदर, महागाई, इस्त्रायल हमास युदध अशा अनेक कारणांनी याचा शेअर बाजारावर प्रभाव दिसला आहे. निफ्टी ५०२५६ गुणांनी कोसळून १८८५७.२५ वर स्थिरावले असून सेन्सेक्स ९०१ गुणांनी घसरत ६३,१४८.१५ वर थांबले आहे. बीएसी मिड कॅप व स्मॉल कॅपलाही नुकसान सहन करावे लागले. रुपयांत देखील घसरण झाली असून ८३.२३ रुपये प्रति डॉलर किंमत रूपयांची झाली आहे.
निफ्टी मध्ये अदानी पोर्टस, एचसीएल टेक, पावर ग्रीड हे शेअर्स तेजीत दिसले परंतू बजाज फायनान्स, एशियन पेंटस, युपीएल हे शेअर्स लूजर ठरले आहेत. निफ्टी बँक इंडेक्स १.२९ टक्यांने घसरला. खाजगी क्षेत्रातील बँक, पब्लिक सेक्टर बँक यांचा अनुक्रमे १.२३ व ०.९६ टक्यांने इंडेक्स घसरला आहे.