फक्त १० मिनिटांमध्ये घेता येणार साईबाबांचं दर्शन!

दर्शनासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगांतून साईभक्तांची सुटका

    26-Oct-2023
Total Views |

Sai Baba

अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे नवीन दर्शन रांग संकुल म्हणजे दोन मजली भव्य इमारत असून ती अनेक सुविधांनी सज्ज आहे. नवीन दर्शन रांग संकुलात १० हजारांपेक्षा जास्त भाविकांसाठी आसनव्यवस्था असलेले प्रतिक्षालय आहे.
 
येथे सामान ठेवण्यासाठी १६ हजार लॉकर्ससह स्वच्छतागृहे, बुकींग काउंटर, लिफ्ट यासारख्या अनेक सुविधा आहेत. त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगांतून साईभक्तांची सुटका होणार असून भाविकांना आता दर्शन घेणे सुलभ होणार आहे.
 
नवीन दर्शन संकुल हे मंदिर परिसरातील जुन्या प्रसादालयाच्या आवारात २६,१०० लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १०९ कोटी रुपये खर्च आला आहे. २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या संकुलाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याच हस्ते संकुलाचे उद्धाटन होत आहे.