बेकायदेशीर मदरशांबाबत योगी सरकार सक्त! बंद करा अथवा भरा दिवसाला १० हजार रुपये दंड
25-Oct-2023
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेश प्रशासनाने मदरशांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील विना परवाना असलेले मदरसे तातडीने बंद करण्यास सांगण्यात येत आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे.
तसेच या आदेशाचे पालन न केल्यास मदरसा संचालकांकडून प्रत्येक दिवसाचा १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगर जिल्ह्यात जवळपास १०० मदरसे आहेत. त्यातील आतापर्यंत १२ मदरशांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
परदेशी निधीतून चालणाऱ्या मदरशांची यादी तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. दरम्यान, ज्या मदरशांची कागदपत्रे सरकारी मानकांनुसार नाहीत असे आतापर्यंत जवळपास १०० मदरसे आढळले आहेत.
यापैकी १२ मदरसा चालकांना प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. तसेच तात्काळ मदरसे बंद न केल्यास त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, 'जमीयत उलेमा-ए-हिंद'ने यावर टीका केली असून मदरशांना मिळालेल्या नोटिसांच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.