शंकराच्या पिंडीवर अभिषेक करुन रोहित पवारांच्या यात्रेला सुरूवात!

    25-Oct-2023
Total Views |

Rohit Pawar 
 
 
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाली आहे. यात्रेची सुरूवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. यापूर्वी पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वर मंदिरात भगवान शंकराच्या पिंडीवर पहाटे अभिषेक करून प्रार्थना केली. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुकमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केलं.
 
आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही ८०० किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला १७ ते १८ किलोमीटरचा प्रवास असेल. पहिला टप्पा ११ किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा ७ किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण ४५ दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप ७ डिसेंबर रोजी होणार आहे. ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.