मुंबई : 'राष्ट्रीय आयुष अभियान'अंतर्गत जिल्हा परिषद पालघर येथे भरती केली जाणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत विविध पदांच्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
पालघर, जिल्हा परिषद अंतर्गत “कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, CPHC सल्लागार, DEIC व्यवस्थापक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (DEIC), दंत तंत्रज्ञ (DEIC), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD), RBSK MO-स्त्री, RBSK MO – पुरुष, पोषणतज्ञ (CTC), बजेट आणि वित्त अधिकारी, ANM (RBSK), ANM (PESA), ब्लॉक फॅसिलिटेटर, सिकलसेल सपोर्ट/शिक्षक” पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.