मुंबई : भारताचे दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटजगतावर शोककळा पसरली. त्यातच आता पाकिस्तानचे माजी कर्णधार इंतिखाब आलम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंतिखाब आलम म्हणाले, बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने ‘लहान भाऊ गमावला, माझ्या हृदयाचा एक भाग गमावला’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, 'खुदा हाफिज, माझ्या मित्रा. माझ्यासाठी रेड वाईनचा ग्लास तयार ठेवा. पुढच्या वेळे पर्यंत!', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, मी त्याला १९७१ पासून ओळखतो. मी सरेकडून काउंटी क्रिकेट खेळत होतो. बिशन इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत होता. त्या दौऱ्यात आम्ही पहिल्यांदाच एका सामन्यात संवाद साधला. भारत सरे खेळत होता आणि त्यांनी प्रसन्ना, चंद्रशेखर आणि बिशन या तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवले होते.
तसेच, मी बिशनच्या गोलंदाजीवर दोन-तीन षटकार मारले. तिसर्या षटकारानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला “कप्तान जी दुसरे भी बॉलर है, मुझे बक्श दो, मेरे पीछे क्यू पड गये (कॅप्टन, बाकी बॉलर्सही आहेत. जरा दया दाखव, तू माझ्या मागे का आहेस), अशी त्यावेळेसची आठवणदेखील शेअर केली आहे.