पर्यावरणातील नवदुर्गा : स्वाती टिल्लू

    23-Oct-2023
Total Views | 43
swati tillu

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...

केवळ बोलून नाही, तर आपल्या कृतीतून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगणार्‍या स्वाती टिल्लू यांनी २०१३ मध्ये मुंबई महापालिकेच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण योजने’अंतर्गत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणि कापडी पिशव्यांच्या वापर या प्रकल्पापासून त्यांच्या कामाची सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून कचरा वर्गीकरणाबाबत त्या जनजागृती करत असून ‘मुंबई ग्राहक पंचायत’, ‘हरित संकल्प’, ‘सेवा भारती’ या संस्थांच्याही त्या कार्यकर्त्या आहेत.

गेल्या दोन वर्षांत बाजारातून फिनायल, हार्पिक यांसारखे रासायनिक पदार्थ न आणलेल्या स्वाती संत्री, मोसंबीच्या सालांपासून स्वतःच ’बायोएन्झाईम’ बनवतात. त्यांच्यासह अनेक महिला आपापल्या घरी ओल्या कचर्‍यापासून खत तयार करतात आणि याबाबत जनजागृतीही करतात. आपल्या घरचा कचरा शून्य कचरा व्हावा आणि प्रत्येक ठिकाणच्या कचरा त्या त्या ठिकाणीच विघटित व्हावा, या दृष्टीने त्या प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कामासाठी नवी मुंबई महापालिकेकडून त्यांना ’स्वच्छाग्रही’ म्हणून ओळख मिळाली आहे.

संकलन आणि शब्दांकन : अंवती भोयर , समृध्दी ढमाले


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121