पर्यावरणातील नवदुर्गा : परवीन शेख

    23-Oct-2023
Total Views |
Parvin Shaikh

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या संस्थेत वैज्ञानिक असलेल्या परवीन शेख गेल्या काही वर्षांपासून पक्ष्यांच्या काही दुर्मीळ प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी काम करत आहेत. २०१७ पासून यमुनेची उपनदी असलेल्या चंबळ नदीवर ‘इंडियन स्किमर’ (पाणचिरा) या पक्ष्याचे संवर्धन करण्याचे काम त्या करत आहेत. नद्यांच्या किनार्‍यावर असलेल्या वाळूच्या ढिगार्‍यांवर अंडी घालणार्‍या पाणचिर्‍याची अंडी इतर प्राण्यांमुळे फारशी शिल्लक राहत नाहीत. या अंड्यांचे संवर्धन व्हावे, या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या परवीन ’पाणचिर्‍याचे संरक्षक’ (guardians of the skimmer) ही मोहीम राबवत आहेत. या मोहिमेचं सध्या तिसरे वर्ष सुरू असून पाणचिराबरोबरच त्या इतर दुर्मीळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठीसुद्धा कार्यरत आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांसाठी संवर्धन उपाय करण्याची त्यांची इच्छा आहे.


संकलन आणि शब्दांकन : अंवती भोयर , समृध्दी ढमाले