पर्यावरणातील नवदुर्गा : डॉ. व्ही. शुभलक्ष्मी

    23-Oct-2023
Total Views | 40
Dr. Shubhalakshmi

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...

पर्यावरण शिक्षिका असलेल्या शुभलक्ष्मी वेगवेगळे प्रकल्प राबवत गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे काम करत आहेत. 'inature फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम सुरू आहे. moth म्हणजेच पतंगांवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. तरुणांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा आणि इतर उपक्रम सुरू असतात. तसेच, संस्थेमार्फत ‘इको रिस्टोरेशन’ची कामेही केली जातात.

एवढंच नाही, तर २०११ मध्ये ‘बर्डविंग प्रकाशक’ आणि २०१४ मध्ये ‘लेडी बर्ड एन्व्हायर्नमेंट कन्सलटिंग’ या दोन संस्थांच्या माध्यमातूनही त्यांचे काम सुरू आहे. शुभलक्ष्मी या एक फुलब्राईट फेलो असून त्यांना त्यांच्या कार्यासाठी ‘वसुंधरा’चा पुरस्कार मिळाला आहे. कीटक विशेषज्ञ म्हणून त्यांना ‘टेस्ला’ कंपनीचाही एक पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुढील काळात ‘लेडी बर्ड एन्व्हायर्नमेंट कन्सलटिंग’च्या माध्यमातून त्या गडचिरोलीतील जंगलात संशोधन करण्याचा त्यांचा मानस आहे.

संकलन आणि शब्दांकन : अंवती भोयर , समृध्दी ढमाले


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121