मुंबई : 'रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड'अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यात येणार आहेत.
या भरतीअंतर्गत 'रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड'मधील सहाय्यक व्यवस्थापक(टेक्निकल), उप-व्यवस्थापक(टेक्निकल), उप-व्यवस्थापक (मार्केटिंग), सहाय्यक व्यवस्थापक(फायनान्स,एचआर) या पदांच्या एकूण ८१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
तसेच, पदांच्या पात्रतेनुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे बंधनकारक असणार आहे. तर अर्जदारासाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा आणि अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक असणार आहे. तर फायनान्स आणि मार्केटिंगसंबंधित पदांसाठी उमेदवाराने एमबीए पदवीप्राप्त असणे बंधनकारक असणार आहे.
'रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड'अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ११ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. तर २१ ऑक्टोबर २०२३ पासून अर्जदारांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. सदर भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.