"सगळं संपलंय.. हॉटेलमधून मृतदेह घेऊन जा"; शेवटचं भेटण्यासाठी बोलवून अझरुद्दीनने केली प्रेयसीची हत्या
23-Oct-2023
Total Views |
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. विवाह निश्चित झाल्यावर शेवटचे भेटण्यासाठी गेलेल्या प्रेयसीची तिच्या प्रियकरानेच हत्या केली आहे. एवढंच नाही तर तिच्या कुटुंबियांना फोन करुन तिचा मृतदेह घेऊन जाण्यासही त्याने सांगितले.
चार वर्षांपूर्वी गाझियाबादमधील अझरुद्दीन या युवकाशी शहजादी या युवतीची भेट झाली होती. त्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि ते काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र, अझरुद्दीन हा आधीच विवाहित असून त्याला मुलेही होती. पण शहजादीशी त्याची भेट झाल्यानंतर तो पत्नी आणि मुलांना सोडून शहजादीसोबत राहू लागला.
यातच शहजादीच्या कुटुंबियांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवले. दिल्लीतील एका तरुणाशी १४ नोव्हेंबर रोजी तिचे लग्न होणार होते. या लग्नाने ती आनंदी होती. परंतू, अझरुद्दीनला हे मान्य नव्हते. त्यामुळे लग्नाआधी एकदा शेवटचे भेटण्याच्या बहाण्याने त्याने शहजादीला २० ऑक्टोबर रोजी एका हॉटेमध्ये बोलवले.
त्यानंतर घरातील न सांगता ती अझरुद्दीनला भेटायला गेली. दरम्यान, रविवार २२ ऑक्टोबर रोजी अचानक अझरुद्दीनने शहजादीच्या घरी फोन केला. तो म्हणाला की, सगळं संपलं आहे. शहजादीचा मृतदेह डासना येथील अनंत हॉटेलमध्ये पडलेला असून तो तिथून घेऊन जा, असे त्याने सांगितले. शहजादीचे कुटुंब हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तिथे तिचा मृतदेह दिसला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस आरोपी अझरुद्दीनचा शोध घेत आहेत.