सर्वसामान्यांना खरेदीसाठी शुभशकुन - सोने चांदी स्वस्त स्वस्त !
मुंबई: सणासुदीच्या काळात सोने चांदी खरेदीसाठी झुंबड उडते. दसरा हा अत्यंत महत्वाचा सण हिंदू समाजासाठी मानला जातो. याच्यातच गेले काही दिवस इस्त्रायल हमास युद्धाचे सावट असल्याने मार्केट मध्ये मंदीचे सत्र सुरू होते. तेलाच्या पर बॅरल दरात अस्थिरता असतानादेखील आज सोने चांदीच्या एमसीएक्स दरात मात्र कपात झाल्याने सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी हा शुभशकुन मानला जात आहे.
Multi Commodity Exchange ( MCX) च्या २३ ऑक्टोबरच्या सत्रात गोल्ड फ्युचर मध्ये ६०७३६ वरून ६०५४६ प्रति १० ग्राम इतकी घट झाली आहे. चांदीच्या भावात देखील ७२०७०६ रूपयांवरून ७१८९५ रू प्रति किलो इतकी घट झाली. मुंबई येथे (२२ कॅरेट ) सोन्याच्या प्रति १० ग्रामची किंमत ५६६०० इतकी होती. तज्ञांच्या मते अनेक कारणांमुळे ही दर कपात झाली ज्यात रूपयाची प्रता डॉलर किंमत वधारली असल्याने याचा परिणाम MCX वर दिसला आहे.