"रावण दहन प्रथेवर बंदी घाला"; अमोल मिटकरींची मागणी

    22-Oct-2023
Total Views |
amol mitkari

अकोला :
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. राज्यात काही भागात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे.

अमोल मिटकरींनी २२ ऑक्टोबरला अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावाला भेट दिली. या गावात रावण मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या आमदार निधीतून सांगोळ्यातील सभागृह बांधकामासाठी दिलेल्या २० लाखांच्या निधीच्या कामाचं भूमिपूजन केलं. भूमिपूजनानंतर अमोल मिटकरी यांनी म्हटले की, रावण हे आदिवासींचे दैवत असेल तर रावण दहन कशाला, आदिवासी बांधवांची भावना रावणासोबत असेल तर रावण दहनाला बंदी घातली पाहिजे. लंकेचा राजा आणि शिवभक्त असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन कशाला? आम्ही रामाची पूजा करतो, पण रावणाचे दहन कशाला असा सवाल त्यांनी केला. रावण दहनावर बंदी घालण्यासाठी आपण विधीमंडळात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.