इस्रायलच्या हल्ल्यात 'अल अन्सार मशीद' जमीनदोस्त

    22-Oct-2023
Total Views |
Al Ansar Mosque 
 
मुंबई : इस्रायली सुरक्षा दलांनी पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागात असलेली अल अन्सार मशीद हवाई हल्ल्यात उडवून दिली आहे. या मशिदीच्या खाली तळघरात इस्लामिक दहशतवादी संघटना हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे दहशतवादी इस्रायलवर मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते, असे इस्रायली सुरक्षा दलांनी म्हटले आहे.
 
या हल्ल्याबाबत इस्रायली सुरक्षा दलांनी जारी केलेल्या निवेदनात इस्लामिक दहशतवादी संघटना हमासचे कमांड सेंटर असे वर्णन करण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२३ पासून इस्रायलवर हल्ले करण्यासाठी या मशिदीचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
इस्रायलने आतापर्यंत गाझा पट्टीतील हमासच्या सर्व ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायली सुरक्षा दलांनी या हल्ल्यात अशा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, जे तेथील निरपराध नागरिकांवर हल्ल्यात सामील होते. गुप्तचर माहितीच्या आधारे हा हल्ला करण्यात आला. मात्र, इस्रायलने ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या किंवा त्यांची नावे इत्यादी माहिती दिलेली नाही.