पश्चिम रेल्वेने सुरू केली नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन

    21-Oct-2023
Total Views |

express

मुंबई :
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते वेरावळ रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे सुरू केल्याची घोषणा शुक्रवारी (२० ऑक्टोबर) केली. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने ही नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू केली आहे. ही ट्रेन २१ ऑक्टोबर २०२३ पासून धावेल.

पश्चिम रेल्वेने सांगितले की, आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या , वांद्रे टर्मिनस आणि वेरावळ स्थानकांदरम्यान तसेच सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल - अहमदाबाद, वांद्रे टर्मिनस - बिकानेर, अजमेर - जयपूर आणि वलसाड - बिकानेर दरम्यान विशेष भाड्यावर साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक १९२०३ वांद्रे टर्मिनस - वेरावळ एक्स्प्रेस दर शनिवारी वांद्रे टर्मिनस येथून सायंकाळी ०७:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:१० वाजता वेरावळला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक १९२०४ वेरावळ - वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस वेरावळहून दर शुक्रवारी सायंकाळी ०५:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:५० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.

ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद, सरखेज, धंधुका, बोताड, ढोला, धसा, लाठी, खिजाडिया, चितळ, लुनीधर, कुंकवाव, वाडियादेवली, जेटलसर आणि जुनागढ या स्थानकांदरम्यान थांबेल. तसेच या रेल्वेमध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121