मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार; राज्य सरकारकडून 'VAT'मध्ये वाढ

    21-Oct-2023
Total Views |
liquor-prices-5-percent-increase-in-vat-by-the-state-government

मुंबई :
बार, रेस्टारंट तसेच क्लबमधील मद्याचे दर वाढणार आहेत. राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य शासनाने याआधीच अबकारी परवाना शुल्क वाढवलं असताना आता व्हॅटमध्येही ५ टक्क्यांची वाढ केल्याने आता एकूण १० टक्के व्हॅट लावला जाणार आहे. यानिर्णयामुळे मद्याचे दर आणखी वाढणार आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे बार, क्लब व कॅफेमध्ये जाऊन मद्यपान करणाऱ्या मद्यशौकिनांना आता आपला मद्यछंद पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

तर दुसरीकडे बारमालक संघटनांनी या निर्णयाला विरोध करत याचा व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा रेस्टॉरंटवर मोठा परिणाम होणार असून यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारावरही विपरीत परिणाम होईल, असे आहार संघटनेचे प्रमुख सुकेश शेट्टी म्हणाले.