मुंबई : इस्त्रायल आणि हमासमधील युद्धात अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने आपली युद्धनौकादेखील पाठवली आहे. या युद्धात दररोज असंख्य लोक आपला जीव गमावत असताना आता एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे.
हमासच्या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या दोन अमेरिकन मायलेकींना सोडले आहे. हमासने पहिल्यांदा अपहरण करुन ओलिस ठेवलेल्या नागरिकांपैकी दोन महिलांना सोडले आहे. या दोघी अमेरिकन मायलेकी आहेत. मानवतेच्या कारणामुळे त्यांना सोडल्याचे सांगण्यात येत आहे. जुडीथ आणि नेटली रानन अशी या दोन महिलांची नावे आहेत.
मागील दहा दिवसांपासून हमासच्या कैदेत होत्या. दरम्यान, या दोन महिलांच्या सुटकेनंतर हमासच्या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या उर्वरित नागरिकांची देखील सुटका करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले आहे.