एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडला वित्तीय वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 595 कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (PAT), वार्षिक 46 टक्के वाढ

लक्ष्य 2026 " ची उद्दिष्टे वेळेपूर्वी साध्य करून फिनटेक@स्केलमध्ये रूपांतर; प्लॅनेट अँप ने ओलांडला 60 लाख डाउनलोडचा टप्पा

    21-Oct-2023
Total Views |

L & T
 
एल अँन्ड टी होल्डींग्ज लिमिटेडला वित्तीय वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 595 कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (PAT),वार्षिक 46 टक्के वाढ

'लक्ष्य 2026 ' ची उद्दिष्टे वेळेपूर्वी साध्य करून फिनटेक@स्केलमध्ये रूपांतर; प्लॅनेट अँप ने ओलांडला 60 लाख डाउनलोडचा टप्पा

• यंदाच्या तिमाहीतील उच्चांकी रिटेल कर्जवितरण साध्य करताना 13 हजार 499 कोटी रुपयांचे वितरण, वार्षिक 32 टक्के वाढ, व्यवसायाचे भरभक्कम प्रारुप, रिटेलच्या सर्व प्रकारात मजबूत वाढीबरोबरच उच्च दर्जाच्या डिजीटल तंज्ञाची आणि डाटा अॅनेलिटिक्सची जोड यामुळे ही वाढ साध्य
 
• एकूण कर्जात रिटेल पोर्टफोलिओचे प्रमाण आता 88 टक्के, 'लक्ष्य 2026' मधील उद्दीष्टापेक्षाही सरस कामगिरी बजावताना 80 टक्क्यांपेक्षा अधिक रिटेल कर्जाचे प्रमाण गाठण्यात यश
 
• घाऊक कर्जाच्या प्रकारात वेगवान कपातीमुळे वार्षिक 76 टक्क्यांनी तीव्र कपात साध्य, 'लक्ष्य 2026' मधील उद्दीष्टांनुसार तब्बल 28,740 कोटी रुपयांची प्रत्यक्ष कपात आणि त्यामुळे उच्च दर्जाची,रिटेल फायनान्स कंपनी बनण्याच्या प्रयत्नांना आणखी गती प्रदान
 
• प्लॅनेट अँपने 60 लाख डाऊनलोडचा ओलांडला टप्पा; डिजीटल तंत्रज्ञानाच्या ताकदीतून फिनटेक@स्केल बनण्याकडे वाटचाल
 
• संस्थांच्या प्रस्तावित विलीनीकरणासाठी एनसीएलटीची मंजुरी प्राप्त; एकल कर्ज देणाऱ्या कंपनीच्या निर्मितीकडे आणखी एक पाऊल जवळ
 

मुंबई: देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या आणि अतिशय झपाट्याने ग्राहक केंद्रीत,उच्च दर्जा,डिजीटल तंत्रज्ञानाने परिपूर्ण रिटेल एनबीएफसीकडे आपला प्रवास करणाऱ्या एल अँन्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेड (एलटीएफएच) ने 30 सप्टेंबर 2023 अखेरच्या दुसऱ्या तिमाहीत 595 कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) नोंदविला आहे. गतवर्षातील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा या नफ्यात 46 टक्के वाढ झाली आहे.
 
एकूण कर्ज वाटपात कंपनीने रिटेल कर्ज पोर्टफोलिओचे प्रमाण 88 टक्क्यांवर नेले असून 'लक्ष्य 2026' मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या 80 टक्के रिटेल कर्जाच्या उद्दीष्टापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. कंपनीने तीन वर्षां आधीच 'लक्ष्य 2026' मधील बहुतांश उद्दीष्टे साध्य केली आहेत.
 
वित्तीय वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत शुभारंभ करण्यात आलेले कंपनीचे ग्राहकाभिमुख अॅप्लिकेशन-प्लॅनेट अँप ग्राहक वर्गासाठी सक्षम डिजीटल चॅनेल म्हणून उत्तम पर्याय ठरला असून या अॅपने 60 लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे.
30 सप्टेंबर 2023 अखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील रिटेल कर्जवितरण 13 हजार 499 कोटी रुपयांवर पोहचले असून वार्षिक तिमाहीच्या तुलनेत त्यात 32 टक्के वाढ झाली आहे.एलटीएफएचची स्थापना झाल्यापासून यंदाच्या तिमाहीतील कर्जवितरण हे उच्चांकी रिटेल कर्जवितरण ठरले आहे.रिटेलमधील सर्व प्रकारातील कर्जाच्या मागणीत जोरदार वाढ, हे त्यामागील प्रमुख कारण आहे.एकूण रिटेल कर्जवाटपाची रक्कम आता 69 हजार 417 कोटी रुपयांवर झेपावली असून 30 सप्टेंबर 2022 च्या तिमाहीच्या तुलनेत त्यात 33 टक्के वाढ झाली आहे.
 
यंदाच्या तिमाहीतही एलटीएफएचने घाऊक कर्जाच्या (होलसेल) प्रमाणात झपाट्याने कपातीचे धोरण कायम ठेवले आहे. 'लक्ष्य 2026' मधील उद्दीष्टांनुसार होलसेल कर्जाच्या प्रमाणात गत वर्षातील तिमाहीच्या तुलनेत 76 टक्के कपात होऊन ते 38 हजार 58 कोटींवरुन 9 हजार 318 कोटी रुपयांवर आले आहे.त्यामुळे एलटीएफएचचे रिटेल फिनटेक@स्केल अर्थात बड्या रिटेल फिनटेक कंपनीत रुपांतर झाले आहे.
 
कंपनीच्या चमकदार आर्थिक कामगिरीबद्दल बोलताना एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. दिनानाथ दुभाषी म्हणाले, “आमची 'लक्ष्य 2026' ची बहुतेक उद्दिष्टे साध्य केल्यानंतर, मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की,आम्ही एका अव्वल दर्जाच्या रिटेल फायनान्स कंपनीत रूपांतर करण्याचा मार्ग सुरूच ठेवलेला आहे. या तिमाहीत,एलटीएफएचने केवळ 88 टक्के रिटेल पोर्टफोलिओचे मिश्रणच गाठले नाही, तर 32 टक्के वार्षिक वाढ नोंदवून, 13 हजार 499 कोटी रुपयांचे आतापर्यंतचे सर्वोच्च तिमाही रिटेल कर्जवितरण देखील साध्य केले आहे. या यशाचे श्रेय एका बाजूला रिटेल कर्ज मालमत्तेची पुस्तिका (बूक) मजबूतपणे वाढवण्याच्या दुहेरी धोरणाला दिले जाते आणि दुसऱ्या बाजूला होलसेल कर्ज पुस्तिकेत तीव्र कपात सुनिश्चित करून, सर्वोत्तम श्रेणीच्या मालमत्तेची गुणवत्ता राखली जाते.”
 
"फिनटेक आघाडीवर, आमच्या ग्राहकाभिमुख प्लॅनेट अँपने आजपर्यंत 60 लाख डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे आणि आमच्या ग्राहकांच्या बहुतेक गरजा पूर्ण करताना त्यांना रोमांचक वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी ते सतत विकसित होत आहे."
“आगामी काळात ग्राहकांच्या संख्येत अधिकाधिक भर घालणे, क्रेडिट अंडररायटिंगमध्ये वाढ करणे, भविष्यकालीन डिजिटल आराखड्याची अंमलबजावणी, ब्रँडची दृश्यमानता वाढविणे आणि कंपनीची क्षमता वाढवणे या 5 प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करताना शाश्वतपणे 'लक्ष्य' मधील उद्दीष्ट्ये साध्य करण्यावर आम्ही नजर कायम केंद्रित ठेवू.एलटीएफएचमध्ये,आमचा ठाम विश्वास आहे की रिटेल विभागामध्ये आशादायक संधी आहेत आणि आम्ही आमचा बँकींग उत्पादन पोर्टफोलिओ, ग्राहकांशी संपर्क, क्षमताविस्तार यांत वाढीबरोबरच व्यवसाय करताना डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून सतत वृध्दी करत प्रगती पथावर मार्गक्रमण करत राहू.आम्ही आमची वाढीची गती कायम ठेवू आणि ग्राहक-केंद्रित आणि शाश्वत फिनटेक@स्केल तयार करण्याच्या दिशेने काम करत राहू.आमच्या डिजिटल सुविधांव्दारे ग्राहक अर्थप्रणालीतील प्रत्येक भागाला स्पर्श करताना ग्राहकांकरिता मूल्य प्रस्ताव म्हणून कंपनी डिजिटल पातळीवर वित्तीयसेवांचा पुरवठा विकसित करत राहील.”
 
निकालाची ठळक वैशिष्ट्येः
 
1) ग्रामीण समूह कर्ज आणि सूक्ष्म वित्तसहाय्याने 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत 5 हजार 740 कोटी रुपये इतके सर्वात जास्त तिमाही वितरण नोंदवले आहे. त्यात 30 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. जुलै आणि ऑगस्ट 2023 मध्ये 1,900 कोटी रुपयांहून अधिक सक्षमरित्या वेगवान वितरणाबरोबरच विविध भौगोलिक प्रदेशांवर अधिकाधिक भर विशेषतः ज्यात दक्षिणेकडील राज्यांच्या वाढीव योगदानाची या वृध्दीला मदत लाभलेली आहे. याव्यतिरिक्त, दर्जेदार कर्जदारांच्या महत्त्वपूर्ण वाटा असलेल्या ग्राहकांची संख्या अधिक उंचावण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. त्यामुळे या विभागाच्या वाढीस देखील प्रोत्साहन मिळाले. या कर्जात 37 टक्के वार्षिक वाढ झाली आहे आणि ते 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या दुसऱ्या तिमाहीतील 15 हजार 840 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत 21 हजार 672 कोटी रुपयांवर झेपावले आहे.
 
 
2) 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत कृषी अवजारांसाठीचे वित्तपुरवठा वितरण 1,534 कोटी रुपयांवर गेले असून 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीतील 1,304 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा 18 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. अॅनेलिटिक्स आधारित वितरक संबंधांमुळे या कर्ज व्यवसायात वाढ दिसून आली. त्यामुळे आघाडीच्या वितरकांच्या सहाय्याने काउंटरच्या माध्यमातून वितरणाचा हिस्सा वाढला असून आणि टॉप अप वित्तीय उत्पादनांद्वारे ग्राहक टिकवून ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले गेले. या व्यतिरिक्त, नवीन ट्रॅक्टर विभागासाठी वितरणामध्ये 15 टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याला किसान सुविधा, टॉप-अप आणि पुनर्वित्त बँकींग उत्पादनाद्वारे ग्राहकांच्या संख्येत वाढ याची जोड मिळाली असून या सर्व घटकांचे वितरणामध्ये 25 टक्के योगदान आहे. या कर्ज प्रकारात वार्षिक 13 टक्के वाढ होऊन ते 13 हजार 351 कोटी रुपयांवर झेपावले आहे. हेच कर्ज 30 सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 11 हजार 865 कोटी रुपयांवर होते.
 
 
3) दूचाकी वाहनांसाठीच्या कर्जपुरवठ्यात 30 सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत सहा टक्के वार्षिक वाढ होऊन ते 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या दुसऱ्या तिमाहीतील 1721 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत 1817 कोटी रुपयांवर गेले आहे. नवीन उपक्रमांद्वारे डीलरशिप्सचे मजबूत जाळे तयार करताना अॅनेलिटिक्स आधारित डीलर संबंधांवर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे. तिमाहीत एलटीएफएचने 7,350 इलेक्ट्रिक वाहनांना (EV) वित्तपुरवठा केला आणि दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) खरेदीवर कर्ज-ते-मूल्याच्या 100 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा करण्यासाठी अथर एनर्जीसोबत (Ather Energy) भागीदारी केली. या कर्जपुरवठ्यात वार्षिक 18 टक्के वाढ होऊन ते 30 सप्टेंबर 2022 च्या दुसऱया तिमाहीतील आठ हजार 93 कोटी रुपयांवरुन यंदाच्या तिमाहीत नऊ हजार 518 कोटी रुपयांवर झेपावले आहे.
 
 
 
4) पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जपुरवठ्यात सातत्याने वाढ होताना त्यात पोर्टफोलिओच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. 30 सप्टेंबर 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत 1308 कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले असून तिमाही दर तिमाहीनुसार त्यात 13 टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या तिमाहीअखेरीस या कर्जाचे वितरण सहा हजार 481 कोटी रुपयांवर झेपावले आहे. सध्याच्या ग्राहक संख्येचा पाया आणखी मजबूत करण्याबरोबरच ई-अग्रीगेटर चॅनेलचा विस्तार करताना पुढील वाटचालीला नवे रुप देण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे.
 
 
5) गृहकर्ज आणि मालमत्तेवर आधारित कर्ज (C वितरणात 30 सप्टेंबर 2023 अखेरीच्या दुसऱ्या तिमाहीत व्यापक प्रमाणात वृध्दी झालेली आहे. गृहकर्ज वितरणात वार्षिक 34 टक्के वाढ होऊन 30 सप्टेंबर 2022 च्या दुसऱ्या तिमाहीतील 1013 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत 1356 कोटी रुपयांवर आले आहे. तर लॅप वितरण यंदाच्या तिमाहीत 378 कोटी रुपयांवर पोहचले आहे. 30 सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ते 104 कोटी रुपये होते. एकूण कर्जाचा आकार लक्षात घेतल्यास गृहकर्जात वार्षिक 34 टक्के वाढ होऊन ते नऊ हजार 105 कोटी रुपयांच्या तुलनेत 12 हजार 216 कोटी रुपयांवर झेपावले आहे. तर लॅप कर्जवितरणात वार्षिक 14 टक्के वाढ होऊन ते 30 सप्टेंबर 2022 च्या दुसऱ्या तिमाहीतील 2665 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत 3038 कोटी रुपयांवर झेपावले आहे.
 
 
6) एसएमई कर्जपुरवठ्यातसुध्दा 30 सप्टेंबर 2023 अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत जबरदस्त वाढ होऊन ते 872 कोटी रुपयांवर गेले आहे. 30 सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ते 201 कोटी रुपयांवर होते. यंदाच्या तिमाहीपर्यंत एकूण कर्जाची रक्कम 2413 कोटी रुपयांवर पोहचली आहे. विविध भौगोलिक प्रदेशात वितरणात केलेली वाढ, अधिकाधिक डिजीटलायझेशसाठी वाढवलेले प्रयत्न आणि वितरणाचे विस्तारीकरण यामुळे एकूण कर्जवितरणात वाढ झाली आहे.
 
 
प्रत्यक्ष प्रयत्नांत वाढ, डिजिटल उपक्रम आणि डेटा अॅनालिटिक्स-आधारित संसाधनांच्या वाटपाद्वारे रिटेल व्यवसायांमध्ये कंपनीने मजबूत संकलन कार्यक्षमता राखली आहे.