सरकार २०२४ पासून सेमीकंडक्टर रिसर्च सेंटर आकारणार
मुंबई: इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सहाय्याने पुढील वर्षापासून उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटरची स्थापना सुरू करेल,असे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले.
सेमीकंडक्टर संशोधनाच्या नेतृत्वात भारतीयांचा सहभाग असावा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी असल्याचे मंत्री म्हणाले.तज्ज्ञांच्या समितीने अहवाल सादर केल्यानंतर चंद्रशेखर यांनी पीटीआयला सांगितले की," भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटरची रचना करण्यासाठी जगभरातील आणि देशातील सेमीकंडक्टरमधील विचारवंतांचा गट एकत्र बसला आहे."
ते म्हणाले की, प्रस्तावित भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटर ही सेमीकंडक्टर संशोधनातील जागतिक संस्था असेल." डिझाईन,ज्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्या सर्व गोष्टी आज तज्ज्ञांद्वारे तयार केल्या आहेत.याशिवाय एक उच्च दर्जाचा अहवाल सादर केला गेला आहे. मला आशा आहे की 2024 मध्ये, या संस्थेची सुरुवात आपल्याला आकार घेईल," चंद्रशेखर म्हणाले.
ते म्हणाले की, भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटर पुढील 4-5 वर्षांत अग्रगण्य सेमीकंडक्टर संशोधन संस्थांपैकी एक बनेल. संस्थेला आवश्यक असलेल्या गुंतवणुकीत कोणतीही अडचण येणार नाही,असे चंद्रशेखर म्हणाले. संस्थेत विकसित होणार्या आयपीआर (बौद्धिक संपदा अधिकार)साठी ही गुंतवणूक अनुदान किंवा इक्विटी स्वरूपात असेल का असे विचारले असता, मंत्री म्हणाले की सरकारी गुंतवणुकीच्या स्वरूपाचा निर्णय नंतर घेतला जाईल.