"कोण अखिलेश? सोडा त्याला"; जागावाटपावरुन I.N.D.I.A आघाडीतील वाद चिघळला

    21-Oct-2023
Total Views |
akhilesh-yadav 
 
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन सुरु झालेला I.N.D.I.A आघाडीतील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाने काँग्रेसकडे ६ जागा मागितल्या होत्या. पण काँग्रेसने त्या दिल्या नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना धोकेबाज आणि चिरकुट म्हटले होते.
 
अखिलेश यादव यांच्या या विधानावर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी अखिलेश यादव यांना ओळखण्यासच नकार दिला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळताना ते म्हणाले की, "'अरे, अखिलेश-वखिलेश सोडा."
 
कमलनाथ यांच्या या विधानानंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. I.N.D.I.A आघाडी स्थापन झाल्यापासून ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. पहिल्याच निवडणूकीत जागा वाटपावरुन वाद निर्माण झाल्यामुळे I.N.D.I.A आघाडी भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.