भारताचा विजयी ‘चौकार’

    20-Oct-2023
Total Views |
iccworldcup

पुणे :
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने बांगलादेशचा सात गडी राखून दणदणीत पराभव करून, या स्पर्धेतील सलग विजयाचा चौकार ठोकला. याच सामन्यात विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४८ वे शतक झळकावले. तसेच त्याने सर्वांत जलद २६ हजार आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या. त्याने ५६७ डावांत ही कामगिरी केली. यापूर्वी ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने ६०० डावांत, ही कामगिरी केली आहे.

पुण्यातील एमसीए मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत आठ गडी गमावत २५६ धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी २५७ धावांचे लक्ष्य ४१.३ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. २५७ या किरकोळ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने शानदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या दहा षटकांत ६३ धावा फटकावल्या. त्यांच्यात ७६ चेंडूत ८८ धावांची सलामी भागीदारी झाली.