असुरक्षित कर्जवाटपासाठी सध्याच्या नियमात बदल करणार नाही - आरबीआयचे सुत्र

    20-Oct-2023
Total Views |
RBI
 
 
असुरक्षित कर्जवाटपासाठी सध्याच्या नियमात बदल करणार नाही - आरबीआयचे सुत्र
 
मुंबई: रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जाच्या नवीन नियमावली बनवण्यासाठी लाल कंदील दिला आहे.अजून अभिप्रेत नसलेली अशी परिस्थिती न उद्भवल्यामुळे आरबीआयने आहे त्याच नियमावलीला पुढे ठेवायचे काम केले आहे.ही माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेला आरबीआयच्या सुत्रांनी दिल्याची बातमी रॉयटर्सने दिली आहे.
 
गेल्या काही काळात भारतात विशेषतः Unsecured Loan ( असुरक्षित कर्ज) ज्यामध्ये वैयक्तिक कर्ज व क्रेडिट कार्ड सेवा दिली जाते या सेवेचा ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागच्या वर्षी तब्बल १५ टक्यांने या कर्जवाटपत वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डमधून अपेक्षित असलेली थकबाकी ही १.६८ अब्जावरून २.१८ अब्ज इतकी वाढ झाली आहे.आरबीआयच्या आकड्यांनुसारच ही लक्षणीय वाढ झाली असून वैयक्तिक कर्ज वाटपात २६ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
आरबीआयने याआधीच बँकांना पारदर्शकते बरोबर सजग रहायची सुचन केली आहे. वैयक्तिक कर्जाच्या बाबतीतही सर्तक रहायचे सांगितले आहे ‌परंतु तितकी चिंताजनक परिस्थिती नसल्याने एवढ्यात यात कायदे दुरूस्ती करणार नसल्याचे आरबीआयच्या सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.