सरकारी शाळेचा मुख्याध्यापक 'आफताब अहमद'कडून विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

    02-Oct-2023
Total Views | 73
 sexual harassment
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. आफताब अहमद असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. "तो विद्यार्थ्यांना आपले गुप्तांग धरायला लावायचा", असा स्पष्ट उल्लेख पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
 
याबाबत पालकांनी मुख्याध्यापक आफताब अहमदला विचारणा केली असता त्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण आझमगडमधील सिद्धरी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. ५५ वर्षीय आफताब अहमद हे कटघर गावातील सरकारी शाळेचा मुख्याध्यापक आहे.
 
पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, आफताब अहमद त्यांच्या मुलांना शाळेत त्याचे गुप्तांग उघडायला लावायचा. काही वर्षांपूर्वीही त्याने असा प्रकार केल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र त्यावेळी आफताबने माफी मागून प्रकरण मिटवले होते. काही वेळाने तो पुन्हा विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करू लागला.
 
याच क्रमाने १ ऑक्टोबर रोजी त्याने एका १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत घाणेरडे कृत्य केले. विद्यार्थिनीने घरी येऊन सर्व हकीकत आईला सांगितली. विद्यार्थिनीची आई शाळेत पोहोचल्यानंतर आफताबच्या कृत्याने प्रभावित झालेल्या इतर विद्यार्थ्यांचे पालकही तेथे पोहोचले. पीडित विद्यार्थ्यांचे वय १० ते १३ वर्षांच्या दरम्यान आहे.
 
पीडित विद्यार्थ्यांनीच्या आईच्या म्हणण्यानुसार, आफताबने आपली चूक मान्य करण्याऐवजी भांडण सुरू केले. त्याने आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ केली. सर्व पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारीवर साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आफताबविरुद्ध आयपीसी कलम ३५४, २९४ आणि ५०४ सोबत एससी/एसटी आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121