बिहार सरकारची जात जनगणना जाहिर, हिंदूंची संख्या घटली तर मुस्लिमांची वाढली

ओबीसी ३६.१ टक्के, मागसवर्गिय २७.१२ टक्के

    02-Oct-2023
Total Views |

bihar caste census


नवी दिल्ली :
बिहार सरकारने सोमवारी जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये अतिमागासवर्गीय ३६%, इतर मागास वर्ग (ओबीसी) २७% आहे. धक्कादायक म्हणजे बिहारमध्ये हिंदूंची संख्या ८२.७ टक्क्यांवरून ८२ टक्के एवढी घटली आहे तर मुस्लिमांची संख्या १६.९ टक्क्यांवरून १७.७ टक्के झाली आहे.

बिहारचे मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बिहार जाती-आधारित प्रगणना पुस्तकाचे प्रकाशन केले. जात सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये मागासवर्गीय २७.१३ टक्के, अतिमागासवर्गीय ३६.०१ टक्के आणि इतर मागासवर्गीय १५.५२ टक्के लोक आहेत. तर बिहारची एकूण लोकसंख्या १३,०७,२५,३१० आहे, ज्यामध्ये मागासवर्गीय ३,५४,६३,९३६, अतिमागास वर्ग ४,७०,८०,५१४, अनुसूचित जाती २,५६,८९,८२०, अनुसूचित जमाती २१,९९,३६१, अनारक्षित ९१,६७९. आहेत. बिहार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये ८२% हिंदू, १७.७% मुस्लिम, .०५% ख्रिश्चन, .०८% बौद्ध, .००१६% टक्के लोकांनी त्यांचा कोणताही धर्म नसल्याचे सांगितले आहे.

जातजनगणनेच्या अहवालानुसार, राज्यात यादव – १४.२६%, रविदास- ५.२५%, दुसाध-५.३१%, कोईरी- ४.२१%, ब्राह्मण- ३.६७%, राजपूत- ३.४५%, मुसहर- ३.०८%, भूमिहार- २.८९%, कुर्मी- २.८७%, तेल - २.८१%, व्यापारी-२.३१%, कानु-२.२१%, चंद्रवंशी-१.६४%, कुंभार - १.४०%, सोनार-०.६८%, कायस्थ - ०.६०% अशी आकडेवारी समोर आली आहे.

हिंदूंची लोकसंख्या घटली, मुस्लिमांची वाढली

२०११-२०२२ दरम्यान बिहारमध्ये हिंदू लोकसंख्या कमी झाली आहे, तर या काळात मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे. जात जनगणनेच्या अहवालामुळे राज्यातील धार्मिक लोकसंख्याही समोर आली आहे. अहवालानुसार, सध्या बिहारमध्ये हिंदू लोकसंख्या सुमारे ८२% (८१.९९) आहे आणि मुस्लिम लोकसंख्या १७.७% आहे. तर २०११ च्या जनगणनेनुसार हिंदू लोकसंख्या ८२.७% आणि मुस्लिम लोकसंख्या १६.९% होती. सध्या बिहारमध्ये हिंदूंची लोकसंख्या १० कोटी ७१ लाख ९२ हजार ९५८ आहे. तर मुस्लिम लोकसंख्या २ कोटी ३१ लाख ४९ हजार ९२५ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बिहारमध्ये हिंदू लोकसंख्या ८ कोटी ६० लाख ७८ हजार ६८६ होती. तर मुस्लिम लोकसंख्या १ कोटी ७५ लाख ५७ हजार ८०९ होती.

वर्गवार आकडेवारी

खुला वर्ग – १५.५२%

मागासवर्ग - २७.१२%

ओबीसी - ३६.१%

अनुसूचित जाती- १९.६५%

अनुसूचित जमाती – १.६८%

सर्व वर्गांचा विकास साधणार – मुख्यमंत्री नितीश कुमार

जातीवर आधारित जनगणनेने केवळ जातीच उघड केल्या नाहीत तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीचीही माहिती दिली. त्या आधारे सर्व घटकांच्या विकास व उन्नतीसाठी पुढील कार्यवाही केली जाईल. बिहारमध्ये करण्यात आलेल्या जात आधारित जनगणनेबाबत बिहार विधानसभेच्या त्याच ९ पक्षांची लवकरच बैठक बोलावण्यात येणार असून त्यांना जात आधारित जनगणनेच्या अहवालाची माहिती दिली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली. आहे.