मुंबई : अॅप्पलनं आपल्या 10th जनरेशन आयपॅडच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीनं ह्या टॅबलेटची किंमत थेट ५००० रुपयांनी कमी केली आहे. नवीन आयपॅड वाय-फाय मॉडेल ३९,९०० रुपयांमध्ये विकत घेता येईल. फेस्टिवल सेलमध्ये ४००० रुपयांचा कॅशबॅकही मिळेल. हा टॅबलेट अॅप्पल स्टोर आणि पार्टनर स्टोरवरून विकत घेता येईल.
हा आयपॅड गेल्यावर्षी १८ ऑक्टोबरला लाँच केला गेला होता. लाँचनंतर एक वर्षांनी अॅप्पल पॅडच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. नवीन आयपॅड वाय-फाय मॉडेल गेल्यावर्षी ४४,९०० रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेल ५९,९०० रुपयांमध्ये आला होता. मीडिया रिपोर्टनुसार ही कपात आयपॅडची नवीन जेनरेशन येणार असल्यामुळे करण्यात आली असावी. अॅप्पल पॅड अॅप्पल स्टोर सोबतच अॅप्पल वेबसाइटवरून विकत घेता येईल. तसेच अॅप्पल पॅड अॅप्पलच्या पार्टनर स्टोरवरून विकत घेता येईल.