फ्लिपकार्ट ' द बिग बिलियन डेज' ला धमाकेदार प्रतिसाद

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट सेल दरम्यान आठ दिवसांत १.४ अब्ज ग्राहकांची भेट व दैनंदिन व्यावसायिक दिवसांच्या तुलनेत विक्रेत्यांच्या व्यवसायात २.५ पट वाढ

    16-Oct-2023
Total Views |
Flipkart
 
 
फ्लिपकार्ट ' द बिग बिलियन डेज' ला धमाकेदार प्रतिसाद
 
ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट सेल दरम्यान आठ दिवसांत १.४ अब्ज ग्राहकांची भेट व दैनंदिन व्यावसायिक दिवसांच्या तुलनेत विक्रेत्यांच्या व्यवसायात २.५ पट वाढ
 

मुंबई:अमेझॉन पाठोपाठ फ्लिपकार्टच्या 'द बिग बिलियन डेज' (टीबीबीडी) फेस्टिव्हलसेलच्या दहाव्या आवृत्तीला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.फ्लिपकार्टच्या किराणा पार्टनर्सने पहिल्या 4 दिवसात 4 दशलक्षाहून अधिक पॅकेजेस डिलिव्हरी करून अॅक्सेस सेल आणि शॉपिंग फेस्टिव्हलच्या सात दिवसांमध्ये विक्रमी १.४ अब्ज ग्राहकांनी भेट दिल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.कंपनीने आपल्या निवेदनात म्हणल्याप्रमाणे फ्लिपकार्ट सेल दरम्यान आठ दिवसांत १.४ अब्ज ग्राहकांनी भेट देऊन नोंदणी केली आहे.दैनंदिन व्यावसायिक दिवसांच्या तुलनेत विक्रेत्यांच्या व्यवसायात २.५ पट वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत फ्लिपकार्ट प्लस मेंबरशिपमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.सणासुदीपूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत विक्रेत्यांच्या व्यवसायात अडीच पटीने वाढ झाली आहे.
 
फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, "या यशाच्या वर्षात, आम्ही आमच्या पुरवठा साखळी मध्ये 1 लाख नवीन रोजगाराची संधी निर्माण करून सणासुदीचा सकारात्मक आनंद पोहोचवत असून ज्यात पूर्तता केंद्रे,सॉर्टेशन सेंटर आणि डिलिव्हरी हब चा समावेश आहे",असे फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी बोलताना सांगितले.औषधांच्या विक्रीत २.५ पटीने वाढ झाली असून ६२ टक्क्यांहून अधिक ग्राहक दुसऱ्या दर्जाच्या शहरांतून आणि त्यापलीकडून येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून,आदल्या दिवसापासून प्रीमियम मेंबर्ससाठी लवकर अॅक्सेस उपलब्ध आहे.अॅमेझॉन आणि मीशो सारख्या प्रतिस्पर्धी ई-कॉमर्स साइट्सच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार,ज्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या फेस्टिव्ह सेल इव्हेंटचे आयोजन केले होते,ग्राहकांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
 
प्लॅटफॉर्मच्या प्रीमियम मेंबरशिप - फ्लिपकार्ट प्लसमध्येही गेल्या वर्षीच्या सेलच्या तुलनेत 60% वाढ झाली आहे.फ्लिपकार्ट फॅशनने नवीन ग्राहक संपादनात महत्त्वाची भूमिका बजावली असून ४४ टक्क्यांहून अधिक नवे ग्राहक या श्रेणीतून येत आहेत.
 
टेलिव्हिजन, ऑडिओ डिव्हाइस, स्मार्टफोन आणि ग्रूमिंग प्रॉडक्ट्स अशा कॅटेगरीतून फ्लिपकार्टची सर्वाधिक विक्री होत आहे.स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि होम अप्लायन्सेसमधील पर्याय या वर्षी पॅन-इंडियामध्ये प्रीमियमाइजेशनचा मजबूत ट्रेंड दर्शवतात,असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.