प्रलोभने या जगात ठायी ठायी आहेत-स्नॅक करण्याचा मोह, तुमचा व्यायाम वगळण्याचा मोह, आवेगाने उगाचच ऑनलाईन खरेदी करण्याचा मोह. या प्रलोभनांवर मात करण्यासाठी आपल्याला इच्छाशक्तीवर विसंबून राहायचे असले तरी, तुमच्याकडे दररोज असलेली इच्छाशक्ती खरे तर मर्यादित आहे. विविध प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही करू शकता अशा काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. काही गोष्टी करण्याच्या वा गुंतण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्याची तुमची लढाई चांगले परिणाम देत नसल्यासारखे वाटत असल्यास, इतर कोणाची तरी मदत घ्या.
प्रलोभने हे आपले नैसर्गिक आवेग आहेत,जे आपले सामाजिक किंवा वैयक्तिक वर्तन प्रवृत्त करतात. परंतु, सर्व नैसर्गिक आवेग योग्य वर्तन प्रवृत्त करतीलच असे नाही. कारण, नैसर्गिक आवेग आपल्या भूतकाळातील परिस्थितीद्वारे नियोजित केलेले असतात. पण, सध्याचे वातावरण प्रत्येक क्षणाला बदलताना दिसते. पूर्वीच्या आयुष्यात जे आपल्याला योग्य वाटत होते, ते आता योग्य वाटत नाही. त्यामुळे आपल्या वागणुकीत सध्याचे वातावरण आणि सध्याचे ध्येय यानुसार बदल करणे आवश्यक आहे. आपण जेव्हा जेव्हा मोहात पडतो, तेव्हा आपण फक्त त्या गोष्टीच्या इच्छेबद्दल विचार करतो, आपण ते मोह भोगल्यानंतर आपल्याला मिळणारा आनंद आपल्या मनात असतो. जेव्हा आपण त्या प्रलोभनाला बळी पडतो, तेव्हा आपल्याला कल्पनारम्य आनंद मिळतो. परंतु, त्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात, हे वास्तव आहे.
उदाहरणार्थ, तुम्हाला बासुंदी खायचा मोह होतो. तुम्ही ती अगदी चवीचवीने खाता. तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, सुरुवातीला जिभेवरच्या त्या अमृततुल्य गोड चवीने भारावून गेल्यावर तुमच्या आहाराचे सूत्र तोडल्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटेल, कदाचित तुमची मधुमेहाची स्थिती तुम्हाला अस्वस्थ करेल. काहीही असो, वास्तवाची जाणीव नेहमीच त्या कृतीत वास्तविक जीवनात होणारे परिणाम आणते. त्या मोहाच्या कृती नंतरच्या परिणामांचा तिरस्कार तुमच्या मनात येत राहतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला ते प्रलोभन वाटेल, तेव्हा आनंदाबद्दल कल्पना करण्याऐवजी, तुम्ही ते भोगल्यानंतर काय भयंकर परिणाम होईल, याची कल्पना करत राहता. त्यानंतर येणार्या नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल कल्पना करता. तेव्हा तुम्हाला किती वाईट वाटेल याची कल्पना करा. अचानक ती कल्पनारम्य परिस्थिती आता इतकी आनंददायी भासत नाही.
प्रलोभनं टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यापासून लक्ष विचलित करणे. मानवी मन अतिशय समन्वयाने व्यवस्थितपणे कार्य करते. जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या जवळ जाते तेव्हा त्याला मोह उत्पन्न होऊ शकतो, ते आपोआप विचारांचा क्रम त्या दिशेने खेचत घेऊन जाईल. जेव्हा तुम्ही मनाच्या त्या अमुक चौकटीत असता, तेव्हा तेथे तुमचे सर्व विचार या मोहामुळे ढगाळलेले असतात. उदा. अजयला टेलिव्हिजनचे व्यसन आहे. जेव्हा तो त्याच्या टेलिव्हिजन रूममधून जातो, तेव्हा त्याला मोह होतो. तो एक निर्णायक क्षण असतो, जिथे तो एकतर त्याच्या मोहाला बळी पडू शकतो किंवा तो परावृत्त होऊ शकतो. जर एखाद्या गोष्टीने त्याचे लक्ष विचलित केले (त्याच्या कुत्र्याने काहीतरी खाली पाडले), त्याच्या विचारांची साखळी अचानक एका नवीन दिशेने खेचली जाईल आणि त्यामुळे मोहात गुंतण्यापासून परावृत्त होण्याची संभाव्यता बळकट होईल. प्रलोभने खरी तर खूप क्षणिक असतात. परंतु, योग्य वेळी निर्णय न घेता आल्यामुळे ती अनंतकाळापर्यंत वाढू शकतात आणि हे सर्व निर्णयाच्या त्या क्षणाला नियंत्रित करू शकणार्या तुमच्या आवेगांवर अवलंबून असते. तुम्ही काय करू शकता की, जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही मोहात पडायची इच्छा नसलेल्या एखाद्या गोष्टीकडे मोहित होत असता, तेव्हा तुम्ही स्वतःचे लक्ष जाणीवपूर्वक विचलित करा.
तुमच्या विचारांची दिशा बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. कोणत्याही स्वैर गोष्टींबद्दल विचार करणे सुरू करा, जसे की तुम्ही पाहिलेली शेवटची क्रिकेट स्पर्धा वा चित्रपट किंवा तुमची पुढील सुट्टी. या मोहाला तुमच्यापासून दूर करणारी कोणतीही गोष्ट विचारात घ्या. ते सर्व तुमच्या हातात आहे. निर्णय घेण्याच्या त्या एका क्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त लक्ष विचलित कसे करावे, हे शिकण्याची गरज आहे.प्रलोभने या जगात ठायी ठायी आहेत-स्नॅक करण्याचा मोह, तुमचा व्यायाम वगळण्याचा मोह, आवेगाने उगाचच ऑनलाईन खरेदी करण्याचा मोह. या प्रलोभनांवर मात करण्यासाठी आपल्याला इच्छाशक्तीवर विसंबून राहायचे असले तरी, तुमच्याकडे दररोज असलेली इच्छाशक्ती खरे तर मर्यादित आहे. विविध प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही करू शकता अशा काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. काही गोष्टी करण्याच्या वा गुंतण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्याची तुमची लढाई चांगले परिणाम देत नसल्यासारखे वाटत असल्यास, इतर कोणाची तरी मदत घ्या. तुम्हाला काय साध्य करायचे आहे आणि तुम्हाला कोणता मोह टाळायचा आहे, ते एखाद्या मित्राला किंवा कुटुंबाला सांगा. ते तुम्हाला कशी मदत करू शकतात, ते त्यांना कळू द्या आणि त्यासाठी जबाबदारी घ्या.
उदाहरणार्थ,जर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या कारणास्तव अल्कोहोल टाळण्याची डॉक्टरांनी चेतावणी दिली असेल. परंतु, तुमचा सोशल समूहामध्ये आणि मित्रांमध्ये दारू पिण्याची प्रवृत्ती असेल, तर अशावेळी तुम्ही तुमच्या एखाद्या दारू न पिणार्या मित्रासोबत कोणत्याही सहलीला जाऊ शकता. हा मित्र तुम्हाला तुम्ही दारू पिणे का टाळावे, याच नेहमी आठवण करून देईल. भविष्यात प्रलोभने टाळता येऊ शकणार्या काही पर्यायांचा शोध घ्या. या प्रकरणात आपल्या प्रलोभनांचा उत्तेजक वस्तू म्हणून विचार करा. जर तुम्हाला न्याहारीसाठी केक खाण्याचा मोह होत असेल, तर तुम्ही केकसाठी एक निरोगी, समाधानकारक पर्याय शोधा. अशा प्रकारे, जेव्हा तुम्हाला नाश्ता म्हणून केक हवा असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्यदायी पर्यायाची वाट पाहू शकता. प्रलोभनाचा प्रतिकार करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे मोहच दूर करा. कधीकधी, मोह सोडणे खूप कठीण असते. जेव्हा असे असेल तेव्हा तो मोह आयुष्यातून काढून टाका. जर तुम्हाला झोपायच्या आधी चॉकलेट खाण्याचा मोह होत असेल, तर चॉकलेट खरेदीच करू नका.प्रलोभनाचा प्रतिकार करण्याचा प्रत्येक क्षण हा विजयाचा असतो.