
अदानी समूहाची मोईत्रा- हिरानंदानी गदारोळावर एक्स वर प्रतिक्रिया
मुंबई:अदानी हिंडनबर्ग विषय माध्यमात चर्चेत असतानाच असतानाच अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अदानींवर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे.यावरून राजकारण तापले असतानाच अनेक नेत्यांच्या यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. रविवारी दुबे यांनी आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी आयोग नेमण्याची मागणी केली होती. ओम बिर्ला यांच्याकडे सादर केलेल्या कागदपत्रात लाच घेतल्याचे पुरावे असल्याचे खासदार दुबे यांनी सांगितले आहे. ६१ पैकी ५१ प्रश्न अदानींवर रोख असल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.
यावर उपहासात्मक ट्विट करत एक्सवर महुआ मोईत्रा यांनी चौकशीला सामोरे जाणार असल्याचे आव्हान दिले आहे.यावर भाजपला अदानीं सारख्या उद्योगपतींवर टीका पचनी पडत नसल्याची जळजळीत प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी देऊन महुआ मोईत्रा यांचे समर्थन केले आहे.राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सेबीला पत्र लिहून तपासातील निष्कर्ष जनतेसमोर ठेवण्याचे निवेदन केले. या सगळ्या बाबतीत दर्शन हिरानंदानी यांनी सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे.हिरानंदानी यांच्याकडून मोईत्रा यांना गिफ्ट व लाँच घेत मोदी अदानी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे सगळे आरोप हिरानंदानी यांनी फेटाळले आहेत.
एनडीटीव्ही वृत्तसंस्थेशी बोलताना हिरानंदानी यांच्या प्रवक्त्याने आरोप फेटाळत ' आम्ही व्यवसायाच्या व्यवसायात असून राजकीय व्यवसायात नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावर अदानी ग्रुपच्या प्रवक्त्याने एक्सवर मिडिया स्टेटमेंट दिले असून त्यात यांनी घडलेल्या घटनेवर भाष्य करत फायनाशिअल टाईम्स मधील बातमीचा दाखला देत अदानींवरील आरोप तथ्यहीन असल्याचे सूचित केले आहे.
' १५ ऑक्टोबर २०२३ मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय देहरडाई ने तक्रार दाखल करत खासदार मोहुआ मोईत्रा व उद्योगपती गुन्हेगारी षडयंत्र रचून अदानींवर रोख आणण्यासाठी लोकसभेत अदानींवर प्रश्न उपस्थित केले. अनेक दिवसांपासून काही समूह, व्यक्ती आमच्या उद्योग समूहावर प्रश्न उपस्थित करून आमची प्रतिमा मलिन करत मार्केट प्रतिष्ठेला तडा देत आहेत.२०१८ पासून आमचे चेअरमन गौतम अदानी व अदानी समूह यांच्यावर आरोप करत आहेत.भाग भांडवलदारकांसाठी,पाठिराखे, गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी आम्ही हे प्रसिद्ध करत आहोत ' असा प्रत्यारोप अदानी समुहाने केला आहे.