मुंबई : आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास आणि गोमातेविषयी अधिकाधिक माहिती असणे आवश्यक आहे. या सर्व विषयांना धरून शेठ गोशाळा मंडणगड येथे 'पंचगव्य विशारद परिचय अभ्यासवर्ग' आयोजित करण्यात आला आहे. पंचगव्य विशारद वैद्यराज पूजनीय राजेश कपूर गुरुजी यांच्या उपस्थितीत त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर (संध्याकाळ) ते २१ नोव्हेंबर २०२३ (सकाळ) या कालावधीत हा अभ्यासवर्ग होईल. वैद्यराज पू. राजेश कपूरजी आणि शेठ गोशाळेकडून हा पाच दिवसांचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. मंडणगड येथील शेठ गोशाळा भारतातील एक नामवंत स्वयंपूर्ण गोशाळा असून तेथे कोकण कपिला गायींवर संशोधन व त्यांचे संवर्धन करण्यात येते. या गोशाळेत सचिन शेठ गेले काही वर्षे सातत्याने विविध प्रयोग व काम करीत आहेत.
वैद्यराज पू. राजेश कपूर यांचा परिचय :
वैद्य राजेश कपूर गेली अनेक वर्षे गाय विज्ञानावर अभ्यास आणि संशोधन करत आहेत. त्यांनी पंचगव्याचे अनेक नवीन शास्त्रीय योग तयार केले असून त्यांनी आजवर हजारो गो-भक्तांना प्रशिक्षण दिले आहे. ऊर्जा विज्ञानातील संशोधनामुळे त्यांना देशातच नव्हे तर परदेशातही ओळख मिळाली आहे. शेकडो पंचगव्य डॉक्टर आज त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत.
वर्गात सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठी...
पंचगव्य विशारद परिचय अभ्यासवर्गाचे एकूण शुल्क रुपये १०,०००/- इतके असून २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत भरावयाची आहे. पहिले २० नोंदणी करण्याऱ्यांसाठी रुपये २०००/- चा डिस्काउंट मिळेल. वर्गात सहभागी होणाऱ्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून केली जाईल. राहण्याची सोय डॉर्मिटरी स्वरूपामध्ये असेल. त्याचप्रमाणे भोजन पूर्ण शाकाहारी पद्धतीचेच असेल.
अभ्यास वर्गातून काय शिकायला मिळणार?
> भारतामधील विविध उपचार पध्दतींचा विशेष परिचय
> आयुर्वेद आणि पंचगव्य परिचय व उर्जा विज्ञान परिचय
> गो पालन कसे करावे
> गोशाळा प्रबंधन कसे असावे
> गोशाळा स्वयंपूर्ण कशी करावी
> पंचगव्य उत्पादने कशी तयार करावी
> पंचगव्य औषधे आणि पंचगव्य उद्योगिक उत्पादने कार्यशाळा
अभ्यास वर्गातील कार्यक्रमांची रचना व वेळापत्रक
वर्गातील सहभागी होणाऱ्यांसाठी काही सूचना
* १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळपर्यंत वर्ग स्थानी पोहोचणे
* वर्गामध्ये भारतीय पध्दतीचा पोषाख आवश्यक आहे
* वर्गामध्ये सर्व सत्रांना शंभर टक्के व वेळेवर उपस्थिती अत्यावश्यक आहे
* वर्गामधील सहभागकडून उत्तम शिस्त आणि उत्तम व्यवहार अपेक्षित आहे
* येताना लेखन साहित्य, बॅटरी, व दैनदिन गरजेच्या वस्तू सोबत आणाव्यात
वर्गस्थानी कसे पोहोचाल?
मंडणगड हे चिपळूणहून ८० किमी, तर महाड, खेड व दापोली येथून ४० किमी अंतरावर आहे. येथून येण्यासाठी एसटी बस उपलब्ध आहेत. तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथून मंडणगड येथे येण्यासाठी थेट एसटी उपलब्ध आहेत.